आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

राष्ट्रीयस्तरीय शूटिंग बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत समर्थ ज्युनिअर च्या वैष्णवी ढोबळे चे यश!!

राष्ट्रीयस्तरीय शूटिंग बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत समर्थ ज्युनिअर च्या वैष्णवी ढोबळे चे यश!!

राज्य शूटिंग बॉल असोसिएशन महाराष्ट्र तर्फे लातूर जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन आणि शूटिंग बॉल असोसिएशन शहर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ४२ वी नॅशनल शूटिंग बॉल चॅम्पियनशिप सिनियर महिला-पुरुष स्पर्धा २०२४ नुकतीच लातूर येथे संपन्न झाली.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या शूटिंग बॉल संघांमध्ये समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे ची विद्यार्थिनी कु.वैष्णवी ढोबळे ची निवड झाली व तिने या स्पर्धेमध्ये आपल्यातील क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन घडवत चमकदार कामगिरी केल्याची माहिती समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर यांनी दिली.

पुणे येथे झालेल्या राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे येथील कुमारी वैष्णवी ढोबळे या विद्यार्थिनीने १९ वर्षे वयोगटातील शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत यश मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली होती.

कु.वैष्णवी ढोबळे ही समर्थ जुनियर कॉलेज बेल्हे येथे इयत्ता अकरावी विज्ञान या शाखेमध्ये शिकत असून जिल्हा,विभाग,राज्य आणि राष्ट्रीय संघामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले.नॅशनल चॅम्पियनशिप शूटिंग बॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आंध्रप्रदेश बरोबर अटीतटीची लढत झाली.यामध्ये महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद मिळाले.
महाराष्ट्र राज्याच्या या उपविजयी संघामध्ये वैष्णवी ढोबळे चा समावेश असणं ही समर्थ शैक्षणिक संकुलाच्या दृष्टीने तसेच तालुका,जिल्हा,विभाग आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन देदीप्यमान कामगिरी करणे ही आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद व अभिमानाची गोष्ट असल्याचे क्रीडा संचालक एच पी नरसुडे म्हणाले.

समर्थ शैक्षणिक संकुलातील विविध विभागातून खेळणारे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जिल्हा,विभाग,राज्यस्तरावर,आंतरविभागीय विद्यापीठ स्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षापासून विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.त्यामध्ये आता वैष्णवी ढोबळे हिची देखील भर पडलेली आहे.
समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक एचपी नरसुडे,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.किरण वाघ,प्रा.विनोद चौधरी,प्रा.संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले,प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांनी कुमारी वैष्णवी ढोबळे हिला मार्गदर्शन केले.

वैष्णवी ने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुमारी वैष्णवी ढोबळे चे अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.