आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी(जारकरवाडी) येथे बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी(जारकरवाडी) येथे बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे भागवत एकादशी निमित्त पायी बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बालचमुन्नी साकार केलेल्या या बालदिंडी सोहळ्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर,मुक्ताई,सोपानदेव,निवृत्तीनाथ,संत तुकाराम,संत एकनाथ,संत नामदेव या सर्व संतांची मांदियाळीच जणू एकत्रित सर्वांना पाहायला मिळाली.कमरेवरती हात ठेवून विठुरायाचे ते सावळे,सुंदर,मनोहर आणि साजिरे स्वरूप त्याचबरोबर रुक्मिणी मातेचे ते अलौकिक रूप पाहून साक्षात पंढरी शाळेमध्ये अवतरल्याचा भास सर्वांना होत होता. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका हातात घेऊन डोक्यावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात विठू नामाच्या गजराने सर्व परिसर दुमदुमून सोडला.मानवी मनोऱ्यातून साकारलेले विठ्ठल-रूखमाई सोबतचे सर्व संतांचे दर्शन,रिंगण,फुगडी,पावली,लेझीम अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण पारंपरिक खेळांनी बालचुमुंनी सर्वांची मने वेधून घेतली.

ज्ञान,विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून बालमनावर केले जाणारे संस्कार भारताचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय थोरात,सह शिक्षक सौ.वैजयंता थोरात यांनी सांगितले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.