आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पुस्तक वाचन महत्त्वाचे असून ग्रंथालयामुळेच मी घडलो – आयपीएस अधिकारी सुरेशजी मेंगडे

पुस्तक वाचन महत्त्वाचे असून ग्रंथालयामुळेच मी घडलो – आयपीएस अधिकारी सुरेशजी मेंगडे

पुस्तक वाचन महत्वाचे असुन गावागावात उत्तम ग्रंथालय असणे गरजेचे आहे. ग्रंथालयामुळेच मी घडलो आहे. पुस्तके वाचायला मिळावी यासाठी मी कोल्हापूर येथे असताना कॉलेज सुटल्या नंतर रोज दोन तास ग्रंथालय चालवत होतो. व त्या वेळेत जास्तीत जास्त पुस्तके वाचत होतो. मी आज जो काही आहे तो पुस्तकांमुळेच आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांन बरोबर सर्वांनीच पुस्तक वाचन करणे गरजेचे आहे. असे मत मुख्य दक्षता अधिकारी मुंबई (आयपीएस ) सुरेशजी मेंगडे यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळ श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालय चांडोली बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण गुणगौरव व समाज रत्न पुरस्कार २०२३ प्रदान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

चांडोली बुद्रुक ता. आंबेगाव येथील विद्या प्रसारक मंडळ व श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने समाज रत्न पुरस्कार २०२३ संपन्न झाला. यावेळी आयपीएस अधिकारी सुरेश सावळेराम मेंगडे, ज्येष्ठ उद्योजक गोविंद ज्ञानेश्वर खिल्लारी, बालरोग तज्ञ डॉ. कैलास भाऊसाहेब धायबर यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ऍड.विजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव गोविंद शिंदे, पंचायत समिती आंबेगाव गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच गावागावात उत्तम ग्रंथालय निर्माण झाल्यास ग्रंथालयाच्या माध्यमातून गावाला समाजाला देशाला उत्तम अधिकारी मिळतात घराघरात मराठी वाचन कमी झाले असून मराठी न वाचणाऱ्या घटकांना वाचन प्रवाहात आणणे गरजेचे आहे मराठी जगातील सर्वात सुंदर भाषा असून ती जगली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथ मित्र प्रा. लक्ष्मण थोरात, उपाध्यक्ष मोहन थोरात, सचिव प्रभाकर मावकर, विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप थोरात, सचिव शंकर धिमते व सर्व कार्यकारी मंडळ समस्त ग्रामस्थ चांडोली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.