ताज्या घडामोडीराजकीय

शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव(दादा) आढळराव पाटील यांनी चांडोली खुर्द गावच्या नवकारभाऱ्यांशी गावामध्ये जाऊन साधला संवाद!!

शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव(दादा) आढळराव पाटील यांनी चांडोली खुर्द गावच्या नवकारभाऱ्यांशी गावामध्ये जाऊन साधला संवाद!!

आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द या गावास शिवसेना उपनेते मा. खा.शिवाजीराव(दादा)आढळराव पाटील यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांशी विकासकामांबाबत संवाद साधला.

चांडोली खुर्द गावासाठी पाणीपुरवठा योजना राबविणे ९३ लक्ष, चांडोली खुर्द येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे १० लक्ष, चांडोली खुर्द गावठाण ते दलितवस्तीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ७ लक्ष या कामांना मंजुरी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आढळराव पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच येथे बैलगाडा घाट रस्ता सुधारणा करण्यात यावी यासह गावांमध्ये आवश्यक भागांमध्ये विद्युत डीपी बसविण्यात याव्यात अशी ग्रामस्थांनी आढळराव पाटील यांच्याकडे मागणी केली.

चांडोली खुर्द हे गाव नेहमी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे व गावकऱ्यांनी मला आजवर प्रत्येकवेळी भक्कम साथ दिली आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. येथील कामांना शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आढळराव पाटील यावेळी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले.

या गावभेट दौऱ्यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण भाऊ गिरे, युवा सेना राज्य विस्तारक सचिन बांगर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके, क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारक समितीचे उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू, शिवसेना तालुका सल्लागार शशिकांत बाणखेले, चांडोली खुर्द सरपंच प्रियांका स्वप्निल इंदोरे, उपसरपंच अमोल दाभाडे, प्रसिद्ध गाडा मालक अनंथा पाटील इंदोरे, उद्योजक बीटी बांगर, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी इंदोरे, संगीता इंदोरे, संदेश काटे, संजय इंदोरे, माणिक गांजाळे, माजी सरपंच बाळासाहेब घुले, शांताताई इंदोरे, राजू बांगर, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर इंदोरे आदी उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.