क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

लाखनगाव(ता.आंबेगाव)येथे विद्युत मोटार, केबल चोरी करणारे अल्पवयीन आरोपी पारगाव(शिंगवे)पोलिसांच्या ताब्यात!!

लाखनगाव(ता.आंबेगाव)येथे विद्युत मोटार, केबल चोरी करणारे अल्पवयीन आरोपी पारगाव(शिंगवे)पोलिसांच्या ताब्यात!!

पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाखनगाव येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व तांब्याची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.२८/११/२०२३ ते २९/११/२०२३ चे दरम्यान घडली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा छडा लावण्यात पारगाव पोलिसांना यश आले असून पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या जवळून तीन मोटर पंप, दोन मोटर पंपची वायर व गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कुटी जप्त केली आहे. लाखनगाव ता.आंबेगाव येथील दळेवस्ती येथील शेतकरी संदीप तुकाराम दळे यांची ९ हजार रुपये कंपनीची एचपी पाण्यातील मोटर व १ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल असा १० हजार रुपयांची ऐवज चोरी गेला असलेबाबत त्यानी पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी पोलीस हवालदार अजित मडके, पोलीस नाईक शांताराम सांगडे, त्यांचे मदतीस पोलीस अंमलदार संजय साळवे व पोलीस अंमलदार मंगेश अभंग यांना मुफजल आदेश दिले होते. पारगाव पोलीस गुन्हयाचा तपास करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चिचगाईमळा येथे दोन इसम मोटर सायकलवर केबल घेवुन फिरत असून ते त्यांचेकडील पंपाची वायर विक्रीसाठी घेवुन आले आहेत. पोलीस सदर ठिकाणी खात्री करणेसाठी गेले असता तेथे दोन इसम त्यांचे स्कुटी गाडी नं. एम.एच. १४ के.ई. ७०३८ यावर बसले होते. स्कुटीचे पाय ठेवण्याचे मोकळे जागेत काळे रंगाची केबल पोलिसांना दिसली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मोटार सायकलसह पोलीस स्टेशन येथे आणून विचारपुस केली असता त्यांनी सदरची केबल ही मौजे लाखणगाव येथे चोरी केली चोरी केलेले मोटार पंप व केबल ही बेल्हे ता.जुन्नर जि.पुणे येथे राहणारा विशाल अर्जुन खोमणे यास विकले आहे. पोलिसांनी सदर दोन इसमांस घेवुन बेल्हा ता.जुन्नर जि.पुणे येथे विशाल खोमणे याचे दिले पत्यावर गेले असता त्याने सदर चोरीचा माल विकत घेतला असल्याचे कबुल करून सदर चोरीचा माल घरातून काढून दिला. पोलीसांनी एकुण ३ मोटार पंप व २ मोटार पंपाची वायर व गुन्हयात वापरलेली इलेक्ट्रीक स्कुटी असा मुद्देमाल हस्तगत केला असून सदर अल्पवयीन आरोपींवर पारगाव पोलीस ठाण्यात यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, मा.अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे पारगाव, पोलीस हवालदार अजित मडके, पोलीस नाईक शांताराम सांगडे, पोलीस अंमलदार संजय साळवे व पोलीस अंमलदार मंगेश अभंग यांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.