ताज्या घडामोडीसामाजिक

वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील महिलांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे,जोतिबाचे दर्शन!!

सामाजिक बांधिलकी जपत गावचे मा.सरपंच श्री.संजयशेठ पोखरकर यांच्या माध्यमातुन आयोजन!!

वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील महिलांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे,जोतिबाचे दर्शन!!

सामाजिक बांधिलकी जपत गावचे मा.सरपंच श्री.संजयशेठ पोखरकर यांच्या माध्यमातुन आयोजन!!

आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर गावचे मा.सरपंच संजयशेठ पोखरकर यांच्या माध्यमातुन गावातल्या २०० महिलांनी कोल्हापूरची महालक्ष्मी, जोतिबाचे मोफत देवदर्शन घेतले.

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी आपली सामाजिक बांधिलकी जोडलेली असते. त्या समाजाचे आपण नेहमीच देणे लागत असतो.समाजाच्या उपकारातून कूठेतरी उतराई होण्यासाठी आम्ही हा समाजशील उपक्रम राबवले असल्याचे पोखरकर यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

या धार्मिक यात्रेची सुरुवात प्रसिद्ध उद्योजक फकिराशेठ आदक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली.या प्रसंगी सरपंच मिराताई पोखरकर, चेअरमन पोपटशेठ राजगडे, सावळेराम आदक, तुकाराम आदक, एकनाथ आदक,पांडुरंग पोखरकर, दिलीप पोखरकर,अण्णासाहेब पोखरकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.