क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

अज्ञात चोरट्यांनी मारला ओढ्यावरील ढाप्यांवर डल्ला!!आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव (खडकी) येथील घटना!!

अज्ञात चोरट्यांनी मारला ओढ्यावरील ढाप्यांवर डल्ला!!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव (खडकी) येथील घटना!!

पिंपळगाव तर्फे महाळुंगे (ता.आंबेगाव) येथील आमराई वस्ती ओढ्यावरील असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ५ हजार रुपये किमतीचे १० ढापे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक १९/११/२०२३ ते २१/११/२०२३ रोजीच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत ग्रामविकास अधिकारी कैलास फाकटकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डावखर करत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.