आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने डॉ.अपर्णा खाडे सन्मानित!!

राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने डॉ.अपर्णा खाडे सन्मानित!!

राळेगणसिद्धी- आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान तसेच राष्ट्रीय पर्यटन विकास तथा राष्ट्रीय कला महोत्सव संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३डिसेंबर २०२३रोजी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. अपर्णा खाडे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सोबतच शहापुरातील योगगुरू अब्दुल शेख ,मुकेश दामोदरे वासिंद, ज्ञानेश्वर दिनकर, गायक संगितकार साहित्यिक अरुण साळुंखे डोंबिवली, राजेन्द्र साळुंखे केडीएमसी , दुर्गेशनंदा मुरलीधरन,दर्शना जोशी, एन. डी. कदम टिटवाळा, विठ्ठल डोंगरे गेगाव, बांगर या दोघांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तथा ६ जणांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.