आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पारगाव(शिंगवे) गावातील श्री.संजय पडघनकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार!!

पारगाव(शिंगवे) गावातील श्री.संजय पडघनकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार!!

रयत शिक्षण संस्थेचे हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री.वि.ग. कापूसकर कनिष्ठ म्हाळुंगे पडवळ महाविद्यालयातील उपशिक्षक संजय पडघनकर यांना नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांचे विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिना निमित्त मार्गदर्शन सत्कार समारंभ रविवार, दिनांक 03 डिसेंबर 2023 रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन पुणे या ठिकाणी नुकताच संपन्न झाला. माजी यशदा संचालक श्री रवींद्र चव्हाण , माजी जिल्हाधिकारी श्री.सदानंद कोचे, माजी मंत्री जयदेव गायकवाड, विविध माध्यमिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी यशवंत करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हुतात्मा बाबू गेनू विद्यालय महाळुंगे पडवळ येथील गुणवंत शिक्षक संजय बबन पडघनकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. साहेबराव काळे , शिक्षक, शालेय स्कूल कमिटी, व्यवस्थापन व विकास समिती, या सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.