क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

लाखणगाव(ता.आंबेगाव)येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबलची चोरी!!

लाखणगाव(ता.आंबेगाव)येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबलची चोरी!!

पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाखनगाव येथील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व तांब्याची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.२८/११/२०२३ ते २९/११/२०२३ चे दरम्यान घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लाखनगाव (ता.आंबेगाव) येथील दळेवस्ती येथील शेतकरी संदीप तुकाराम दळे यांची ९ हजार रुपये कंपनीची एचपी पाण्यातील मोटर व १ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल असा १० हजार रुपयांची ऐवज चोरी गेला आहे. विकास सोपान नेमाने यांची ६,५००/- हजार रुपयांची मोटर पंप चोरीला गेला आहे. तर निलेश रामदास रोडे यांच्या शेतातील ७ हजार रुपयांची मोटर व ३ हजार रुपये किंमतीची ताब्याची केबल असे १० हजार रुपयांच्या ऐवज चोरीला गेला आहे. तिन्ही शेतकऱ्यांची मिळून २६,५००/- रुपयांच्या मोटारी व केबल चोरीला गेली आहे.

याबाबत तीनही शेतकऱ्यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांचे मार्गदरशनाखाली पोलीस हवालदार मडके व पोलीस नाईक सांगडे पुढील तपास करत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.