ताज्या घडामोडीराजकीयसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे २० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीतून अनेक विकासकामे काम प्रगतीपथावर !

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे २० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीतून अनेक विकासकामे काम प्रगतीपथावर !
———————————————————————

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावासाठी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व पुणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रूपये निधी मंजुर केला होता.

सुरवातीच्या टप्प्यात १२.३८ कोटी रुपये निधीतून जल जीवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला होता. ह्या योजनेचे व इतर विकासकामे प्रगतीपथावर असून चांडोली फाटा, तुका नाना चौक ते पिंपळगाव(खडकी) या कामाला देखील प्रारंभ होत आहे. येणाऱ्या काळात ह्या रस्त्याची दर्जोन्नती होऊन मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सी.आर.एफ. फंडातून २० कोटी रुपये निधी मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.