आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

चेन्नई येथे ३२ वी ओपन महिला आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात नाशिकच्या अपेक्षा सापुते सहभाग!!

चेन्नई येथे ३२ वी ओपन महिला आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात नाशिकच्या अपेक्षा सापुते सहभाग!!

नाशिक – दि.२६ नोव्हेंबर ते ३० नोहेंबर दरम्यान ३२ वी ओपन महिला आट्यापाट्या स्पर्धा तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय नेहरू स्टेडियमवर आट्यापाट्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये २० राज्याने सहभाग नोंदविला होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पाँडिचेरी राज्य संघाने तर द्वितीय क्रमांक महाराष्ट्र संघाने पटकावला .महाराष्ट्र संघात नाशिकच्या अपेक्षा सापुते सहभाग घेत संघाकडून उत्कृष्ठ खेळत राज्यचे नाव राष्ट्रीय पातळीवर उचाविण्यासाठी बाजी लावत संघाला रौप्यपदक मिळवून दिले.त्याबद्दल

महाराष्ट्र संघाने द्वितीय स्थानी मिळवल्याबद्दल सर्व खेळाडूंनवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विजयी खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नाशिक येथील संकल्प क्रीडा मित्र मंडळ. याच्या वतीने अपेक्षाला प्रशिक्षण देण्यात आले. आट्यापाट्या प्रशिक्षक गणेश ढमसे, रोहन अडांगळे यांनी अथक परिश्रम घेतले. शिंदे ग्रामपंचयात सरपंच गोरख जाधव, रामदास तुगार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.