आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथे काळभैरवनाथ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

 

धामणी(ता.आंबेगाव) येथे काळभैरवनाथ जयंतीनिमित्त
विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री भैरवनाथ मंदिरात काळभैरवनाथ जयंतीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
काळभैरवनाथ जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे काळभैरवनाथ, बटूक भैरव,जोगेश्वरीच्या तिन सर्वांगसुंदर मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला.
कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी करण्यात येते धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकराने अधकासुराचा वध करण्यासाठी कालभैरव अवतार घेतलेला होता कार्तिक कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यान्ह वेळी कालभैरव रुप धारण केले होते.कालभैरव हा महादेवाचा रौद्र अवतार असल्याने कालाष्टमीच्या दिवशी भैरवनाथाची पूजा व दर्शन घेण्याची परंपरा आहे. महाआरतीसाठी गावातील ग्रामस्थ व भैरवनाथाचे सेवेकरी रोडे मंडळी व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात आले.भैरवनाथाचा महाअभिषेक आरती प्रसंगी लक्ष्मणराव रोडे,अजितराव बोर्‍हाडे,आबाजी रोडे,सागर जाधव,कैलासराव रोडे,सुरेश रोडे,शांताराम रोडे,शुभम रोडे,सागर रोडे,आकाश रोडे,रविंद्र रोडे,दत्ता रोडे,निलेश रोडे,किसनराव रोडे,सिताराम जाधव वाघे,दिनेश जाधव,पमाजी पंचरास,प्रभाकर पंचरास उपस्थित होते.

रात्री समस्त पंचरास मंडळीचा भजनाचा कार्यक्रम मंदिराचे आवारात झाला भैरवनाथ मंदिराच्या शिखरावर अतिवृष्टीत वीज पडून शिखराची मोठी हानी झालेली होती त्यानंतर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शिखराचे जिर्णोध्दाराचे काम पूर्ण केलेले असून जिर्णोध्दार केलेल्या संपुर्ण शिखराचे रंगकाम येणार्‍या चैत्र पोंणिमेपर्यत पूर्ण करण्यात येऊन आणि त्यानंतर शिखराचे नवीन कलशारोहन येत्या चैत्र शुध्द पौर्णिमेला करणार असल्याचे धामणी ग्रामस्थ आणि भैरवनाथ देवस्थानाचे सेवेकरी समस्त रोडे मंडळीनी व नवोदित युवकांनी यावेळी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.