हवामानाचा अंदाज करणारे पंजाबराव डख का चर्चेत आहेत?
हवामानाचा अंदाज करणारे पंजाबराव डख का चर्चेत आहेत?
——-
पंजाबराव डख… हा माणूस ना हवामानशास्त्रज्ञ आहे, ना हवामान खात्यातला तज्ज्ञ अधिकारी… पण मराठवाड्याचा हा शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच हवामानाचा अंदाज देतो. हवामानाचा अंदाज सांगायचा झाल्यास त्यामागच्या विज्ञानाचा अभ्यास लागतो. पण पंजाबराव डख हवामान शास्त्रज्ञ नसतानाही अंदाज वर्तवतात. एक साधारण शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच अंदाज वर्तवत असल्यामुळे पंजाबराव डख चर्चेत आलेत. पण डख यांचे हवामानाचे अंदाज खरे ठरतात का? आणि त्यांच्यावर आक्षेप काय आहेत? कोण आहेत पंजाबराव डख?पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचे आहेत. १९९५ पासून ते टीव्हीवर हवामान अंदाज पाहायचे. पण टीव्हीवरील खोटे ठरणारे अंदाज आणि शेतीचं होणारं नुकसान यामुळे पंजाबराव डख यांनी हवामानाचा अभ्यास करायचं ठरवलं. पंजाबराव डख यांनी १९९९ ला परभणीत कॉम्प्युटरचा कोर्स केला. परभणीला जाऊन कॉम्प्युटरवर सॅटेलाइटवर उपग्रहांच्या फोटोंवरून हवामानाचा अभ्यास सुरू केला. उपग्रहांसोबत निसर्गाच्या पारंपरिक खाणा खुणांच्या अभ्यासावरून हवामानाच्या बदलांचा अंदाज घेतला. त्यानंतर १९९९ पासून अचूक अंदाज वर्तवण्यासाठी पंजाबराव डख यांना ओळखलं जाऊ लागलं. हवामान अंदाज सांगण्यामुळे पंजाबराव डख परिसरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर पंजाबराव डख यांनी मोबाइलवरून पावसाच्या अंदाजाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली.२००४ पासून टेक्स्ट मेसेजद्वारे हवामान अंदाजाची माहिती प्रसारीत करायला सुरुवात केली.पुढे व्हाट्सएप आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी जोडले गेले. सध्या महाराष्ट्रातील विविध भागातील १२५० व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हवामान अंदाज पोहचवतात.यूट्यूब चॅनेलद्वारे नियमित हवामान अंदाज जाहीर करण्याचं काम काय आहेत पंजाबराव डख यांच्यावर आक्षेप?पंजाबराव डख हे आपल्या अनुभवावरून पावसाचे अंदाज वर्तवतात. पण त्यांच्यावर काही आक्षेप घेतले जातात. हवामान खांत्यातील तज्ञांच्या मते वेधशाळेने वर्तवलेला अंदाज अधिक विश्वासार्ह असतो. हवामान खात्याच्या अंदाजाची अचूकता जास्त असते. हवानाम शास्त्राचं ज्ञान नसतानाही अंदाज व्यक्त करणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. वारे, ढग, तापमान, आद्रर्तेबद्दलची माहिती अभ्यासून वेधशाळा अंदाज वर्तवते. मात्र, पंजाबराव डख हे केवळ उपग्रह अभ्यास आणि निरीक्षणातून अंदाज सांगत असल्याचा दावा करतात.पंजाबराव डख यांचे हवामान अंदाज बऱ्याचदा खरे ठरले असले तरी पंजाबराव डख हे निसर्गांच्या बदलांचा अभ्यास करून अंदाज सांगताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या अंदाजावर तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. कारण वेधशाळेचा अंदाज विश्वासार्ह असल्याचं तज्ज्ञ मानतात.