आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ शैक्षणिक संकुलात “डेटा सायन्स” आणि “आय टी” या नवीन अभ्यासक्रमांना मान्यता!! विद्यार्थ्यांना मिळणार नोकरीच्या अमर्याद संधी!!

समर्थ शैक्षणिक संकुलात “डेटा सायन्स” आणि “आय टी” या नवीन अभ्यासक्रमांना मान्यता!!

विद्यार्थ्यांना मिळणार नोकरीच्या अमर्याद संधी!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग,बेल्हे (बांगरवाडी) या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (डेटा सायन्स)-प्रवेश क्षमता ३० तसेच समर्थ पॉलिटेक्निक मध्ये इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (आय टी)-प्रवेश क्षमता ६० हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीने परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
समर्थ पॉलिटेक्निक हे उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव एन बी ए मानांकन महाविद्यालय असून आय टी अभ्यासक्रम सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनेकविध करियच्या उपलब्ध संधी हस्तगत करता येणार आहेत.
त्याचप्रमाणे डेटा सायन्स हे क्षेत्र भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे.अलिकडच्या काळात,उपलब्ध डेटाच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि व्यवसायामध्ये डेटाचा अधिक्तम वापर करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.परिणामी,डेटा वैज्ञानिकांना जास्त मागणी आहे.डेटा सायन्स हे तुलनेने नवीन क्षेत्र आहे,ज्यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून स्टॅटिस्टिक्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगपर्यंत विविध विषयांचा समावेश आहे.लिंकडीन,मायक्रोसॉफ्ट,फ्लिपकार्ट,ऍमेझॉन,ओला,एरटेल आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांसारख्या कंपन्या आपापल्या उद्योगातील स्पर्धात्मक यश मिळविण्यासाठी डेटा सायन्सचा वापर करतात.विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोबोटिक सायंटिस्ट,ए-आय इंजिनियर,बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर,रिसर्च सायंटिस्ट,बिग डेटा इंजिनियर,ए-आय डेटा अनालिस्ट अशा विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध आहे.या शैक्षणिक वर्षापासून समर्थ पॉलिटेक्निक मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची प्रवेश क्षमता प्रत्येकी ३० वरून ६० करण्यास तर इंजिनिअरिंग महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ची प्रवेश क्षमता ६० वरून ९०,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ३० वरून ६० करण्यास परवानगी देण्यात आल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.

ई-कॉमर्स,आरोग्य,शिक्षण,सहकार व तंत्रज्ञान,ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ती कमतरता भरून काढण्यासाठी डेटा सायन्स हा अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे.या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासन,सी ई टी सेल,डी टी मार्फत ऑनलाईन राबवण्यात येत असून उत्तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक वर्गाच्या मागणीनुसार बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने हे दोन्ही नवीन अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.