आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेतील युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नंदनवन, मुंबई येथे उत्साहात संपन्न!!

युवासेना राष्ट्रीय कार्यकारीणी आढावा बैठक !!

महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेतील युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नंदनवन, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली.

सदर बैठकीत डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील युवासेनेच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. आगामी काळात होणाऱ्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीत पदवीधर मतदार नोंदणी अभियान गतिमान करून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात युवासेना युनिटची स्थापना करावी तसेच विद्यार्थी व युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून होत असणाऱ्या कल्याणकारी योजनांचा सामान्यांना फायदा मिळवून देण्यासाठी काम करावे आणि विधानसभा निहाय दौरे करून युवासेना पदाधिकाऱ्यांच्या उर्वरित नेमणुका त्वरित करून घेण्याचे आदेश दिले.

यावेळी महाराष्ट्रातील युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व युवती पदाधिकारी उपस्थित होत्या.

Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde

#Shivsena #Yuvasena

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.