आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव (ता.आंबेगाव ) येथील १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाचा आंबेगाव तालुक्यात दबदबा पुन्हा एकदा कायम!!

राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित-न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव (ता.आंबेगाव ) येथील १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाचा आंबेगाव तालुक्यात दबदबा पुन्हा एकदा कायम … विद्या विकास मंदिर,अवसरी या ठिकाणी १७ वर्षे वयोगटातील शासकीय तालुकास्तरीय मुलींचे कबड्डीचे सामने आयोजित केले होते.या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामना हा कमलजादेवी विद्यालय, कळंब आणि न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या दोन संघांमध्ये झाला.अटीतटीच्या सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेने प्रतिस्पर्ध्या संघावर विजय मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. कबड्डीचे अत्यंत चुरशीचे तालुकास्तरीय सामने पाहण्यासाठी लाखणगाव येथून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उद्योजक सोमनाथराव पोंदे,उद्योजक शिरीषकुमार रोडे पाटील,पोलीस अधिकारी सुनिलराव भागवत,प्रशिक्षक इमाम मुजावर,विकास रोडे व अन्य अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित राहूत वेळोवेळी विद्यार्थिनींना प्रेरणा देत होते. सर्वच विजयी खेळाडूंचं, विद्यालयाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अमरजीत खराडे यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक अनिल दिसले,क्रीडा शिक्षक प्रवीण शिकारे,कल्पना राजगुरू,छाया वाघुंडे, रसिका शिंदे,अली इनामदार यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदशन केले.तसेच स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,पालक शिक्षक संघ,माता पालक संघ, ग्रामपंचायत,विविध कार्यकारी सहकारी सोसायटी,आजी व माजी सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक या सर्वांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन-कौतुक केले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.