आरोग्य व शिक्षणराजकीय

आढळराव पाटील यांच्या पाठीशी उभा राहणार- महेश लांडगे

आढळराव पाटील यांच्या पाठीशी उभा राहणार- महेश लांडगे

युतीचा धर्म पाळत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले. पराभव होऊनही आढळराव पाटील यांनी गावा-गावात जाऊन संपर्क ठेवत एक आदर्श निर्माण केला आहे.आगामी लोकसभेला आढळराव पाटील उमेदवार असतील तर त्यांच्या पाठीशी मी तेवढ्याच ताकदीने उभा राहणार आहे.असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले. शिवसेना उपनेते मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे पार पडला. त्यावेळी आमदार लांडगे बोलत होते.

यावेळी जुन्नर चे आमदार अतुल बेनके, मा.आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना नेते इरफान सय्यद,जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर ,पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे,भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे,कल्पनाताई आढळराव पाटील, अक्षय आढळराव पाटील,भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे,संचालक योगेश बाणखेले, हनुमंत तागड, अशोक गव्हाणे, राम तोडकर, महेश ढमढेरे, आबा लांडगे, शोभा आवटे,भिकाजी बोकड, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गीरे, स्वप्निल बाबा बेंडे, मीराताई बाणखेले, उद्योजक विठ्ठल मिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार लांडगे पुढे म्हणाले, गेली 25-30 वर्ष आढळराव पाटील यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. राजकारणात जय-पराजय होत असतो, यश मिळाल्यास हुरळून जाऊ नये अपयश आल्यास खचून जाऊ नये आढळराव पाटील हे आमचे आदर्श आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यावेळी मी युतीचा धर्म पाळत प्रामाणिकपणे त्यांचे काम केले. आगामी लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील उमेदवार असल्यास तेवढ्याच ताकदीने त्यांच्यासोबत उभा राहणार आहे.

याप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आढळराव पाटील व आमच्या कुटुंबाचे गेले अनेक वर्ष कौटुंबिक संबंध आहेत. माजी आमदार वल्लभ बेनके व आढळराव पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे.आढळराव पाटील यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही. त्यांच्या मनात ज्या-ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होवोत अशा सदिच्छा त्यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

प्रमोद भानगिरे यांनी 2024 च्या निवडणुकीत आढळराव पाटील खासदार होतील असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू आढळराव पाटील यांनी केले.

यादरम्यान चला हवा होऊ द्या!! हा करमणुकीचा कार्यक्रम पार पडला. आमदार अतुल बेनके यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. हास्य विनोदविर भाऊ कदम, कुशल बद्रिके,भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे, श्रेया बुगडे,स्नेहल सिंदम यांनी उपस्थित प्रेक्षकांना मनमुराद हसवले. आढळराव पाटील यांच्या वरती सादर झालेल्या गीतावर उपस्थित प्रेक्षकांनी ठेका धरला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.