आरोग्य व शिक्षण

मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी!!

मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी!!

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुण पुष्पहार अर्पण करण्यात आला
स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली.

महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. तसेच विविध भाषेत अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता.
अशा शब्दांत स्वराज्य युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सुनिल गवारी यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला
या प्रसंगी मा.सरपंच दिलीप रणपिसे, सखाराम गवारी, बाळशीराम मेंगडे,दत्तात्रय मेंगडे, अंकुश मेंगडे,साईनाथ मेंगडे,माऊली मेंगडे, नवनाथ दांगट, दिपक गायकवाड,अवधुत मेंगडे,नथुराम मेंगडे, देवराम मेंगडे, बजरंग दांगट तसेच ग्रामस्थ व शिवशंभू भक्त उपस्थितीत होते

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.