अर्थकारण

भैरवनाथ पतसंस्था बँकेमध्ये परावर्तित व्हावी! : पतसंस्थेच्या सोळाव्या चाकण शाखेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे शुभहस्ते संपन्न!

भैरवनाथ पतसंस्था बँकेमध्ये परावर्तित व्हावी!
: पतसंस्थेच्या सोळाव्या चाकण शाखेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे शुभहस्ते संपन्न!
~~~
पतसंस्था सर्वसामान्यांना पत निर्माण करून देण्याचे काम करते. भैरवनाथ पतसंस्थेचा कारभार अतिशय व्यापक आणि योग्य पद्धतीने सुरू असून या पतसंस्थेचे बँकेत रुपांतर होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या १६व्या चाकण, ता.खेड येथील शाखेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी दादांनी संस्थेच्या कारभाराचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

पूर्वी शेतकरी सावकाराकडून कर्ज घ्यायचा. त्याच्या भरमसाठ व्याजाची परतफेड करता येत नसल्याने आपली हक्काची जमीन सावकाराच्या तोंडी घालण्याची नामुष्की शेतकऱ्यावर यायची त्यामुळे आपल्या गावामध्ये भैरवनाथ पतसंस्थेची सुरुवात केली. आज राज्यभर पतसंस्थेचा विस्तार वाढलेला आहे. ग्रामीण भागातील लोकांसह मुंबईतील व्यवसायिकांनी माझ्यावर विश्वास दाखवत पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या. त्यामुळे आज या पतसंस्थेची उलाढाल सहाशे कोटींच्या पुढे झाली आहे. कर्ज वितरणाबरोबरच कोरोनासारख्या महामारीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे व लोकांना शक्य ती मदत करण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून झाले असल्याचे यावेळी प्रतिपादन आढळराव पाटील यांनी केले. तसेच पतसंस्थेच्या यशामध्ये सहभागी असलेल्या सर्व ठेवीदार, कर्जदार, सभासद, संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी अभिनंदन केले.

चाकणमधील आंबेठाण चौकात झालेल्या या नवीन शाखेच्या उद्घाटनास माजी आमदार शरद सोनवणे, कामगार नेते इरफान सय्यद, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तालुकाप्रमुख राजू जवळेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, स्व. सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, युवानेते नितीन गोरे, कल्पना शिवाजीराव आढळराव पाटील, प्रिया नारायणराव पवार, चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, चाकणचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.