अर्थकारणआपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

रुद्रा फाउंडेशनकडून 7 दिवस 7 स्पर्धांचे आयोजन!!

रुद्रा फाउंडेशन कडून 7 दिवस 7 स्पर्धांचे आयोजन!!

अकलूज -दीपावली सुट्टी निमित्त विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांना आपले कला कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून रुद्रा फाउंडेशन अकलूज यांचे तर्फे सात दिवस सात स्पर्धा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मा संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिनांक 31 रोजी विज्ञानपर निबंधलेखन स्पर्धा , दिनांक 1 रोजी देशभक्तीपर ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धा, दिनांक 2 रोजी ऑनलाइन कथाकथन स्पर्धा, दिनांक 3 रोजी दीपावली शुभेच्छापत्र बनविणे स्पर्धा, दिनांक 4 रोजी किल्ला सजावट स्पर्धा, दिनांक 5 रोजी मेहंदी स्पर्धा आणि दिनांक 6 नोव्हेंबर रोजी भव्य बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पहिली ते चौथी , पाचवी ते दहावी आणि खुल्या गटात घेण्यात येणार असल्याने या स्पर्धेमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वजण सहभागी होऊ शकतात.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9970103439 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून बक्षिसे जिंकावीत असे आवाहन रुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष गाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.