आरोग्य व शिक्षण

पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला महाशिवरात्री चा सोहळा!!

पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला महाशिवरात्री चा सोहळा!!

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे महाशिवरात्री चा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम, भाविकांना फराळाचे वाटप, भजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

सकाळी होमहवन, पुजा,आरती संपन्न झाली. त्यांनतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. खिचडी,केळी, खजुर यांचे वाटप सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत चालु होते. गावातील एक हजार लोकांनी या फराळाचा लाभ घेतला. पारगाव(शिंगवे) गावातील पारेश्वर बाल भजणी मंडळ व ज्ञानेश्रर प्रासदिक भजणी मंडळ या ठिकाणी भजनी मंडळ चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

गावातील सर्व तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला. मोरया युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत दूध वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच बबन ढोबळे, मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बजरंग देवडे,ग्रामपंचायत सदस्य सचिन देवडे, बबन साबळे, बबन बारवे ,एकनाथ कुटे, ओमकार ढोबळे ,शंकर देवडे,साईनाथ गायकवाड ,दिपक साबळे, रामदास ढोबळे, तेजस जगताप, निलेश हरिहर, दत्ता आव्हाड , किरण कोल्हे, पांडुरंग सरोदे,तसेच गावातील सर्व तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.