अर्थकारण

श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या 16 व्या नूतन चाकण शाखेचे ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते 16 फेब्रुवारी ला होणार उदघाटन!!

श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या 16 व्या नूतन चाकण शाखेचे ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते 16 फेब्रुवारी ला होणार उदघाटन!!

सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून नावारुपाला आलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी,चिंचोडी या संस्थेच्या नूतन चाकण शाखेचे उद्घाटन गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी सायं.4.00 वा.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, वस्त्रोद्योग,संसदीय कार्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते व शिवसेना उपनेते मा.खा.श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सागर काजळे यांनी दिली आहे.

संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या भैरवनाथ पतसंस्थेच्या मुख्यालयासह सोळा शाखा सध्या कार्यरत असुन त्यासंपूर्ण संगणकीकृत आहेत. संस्थेने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत संस्थेचे ऑनलाईन ॲप तसेच क्यू.आर.कोड ची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली असल्याने संपूर्ण भारतातून कोठूनही ग्राहक संस्थेत व्यवहार करू शकतो.संस्थेकडे आज अखेर 365 कोटींच्या ठेवी असुन 280 कोटींचे कर्ज वाटप केले आहे.संस्थेला स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सागर काजळे यांनी दिली आहे.

केवळ नफा कमावणे हाच उद्देश न ठेवता, सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने गरजू लोकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. नैसर्गिक आपत्ती असो अथवा समाज उपयोगीकामे मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. समाजसेवेचा हा वसा आणि वारसा या पुढील काळातही असाच जपुन दादांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावत नेला जाईल असे ही काजळे यांनी या वेळी सांगितले.

या उदघाटन प्रसंगी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.