आरोग्य व शिक्षण

राजगुरुनगर जवळील शिरोली परिसरात पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्य

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्य

राजगुरुनगर:-पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील राजगुरुनगरजवळ असणाऱ्या शिरोली परिसरात सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या घटनेत भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. पुणे–नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून तर 17 महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटाजवळ महिला रस्ता ओलंडत होत्या. त्यावेळी पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरदार धडक दिली. त्यात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 17 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महिलांवर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना धडक दिली.

पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी या महिला गेल्या होत्या. काम संपवून त्या महिला घरी जात होत्या. परंतु घरी पोहचण्यापुर्वीच काही महिलांना काळाने गाठले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने मदत पुरवली. यामुळे जखमी महिलांना लवकर उपचार मिळाले. स्थानिक पोलिसांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला अन् तातडीने जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलांना चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.