अर्थकारणआपला जिल्हाताज्या घडामोडी

भैरवनाथ पतसंस्थेच्या चाकण येथील नवीन शाखेचा लवकरच शुभारंभ!

लांडेवाडी(ता. आंबेगाव) येथे पतसंस्थेच्या दैनंदिन डायरी व टेबल बुकचे प्रकाशन संपन्न

भैरवनाथ पतसंस्थेच्या चाकण येथील नवीन शाखेचा लवकरच शुभारंभ!
● लांडेवाडी येथे पतसंस्थेच्या दैनंदिन डायरी व टेबल बुकचे प्रकाशन संपन्न
——-
श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांचा विचार केला आहे. पतसंस्थेने ठेवीवरील व्याजदर वाढवून ते नऊ टक्के केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दैनंदिन डायरी व टेबल बुकचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अनावरण सोहळ्यास पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बानखेले, महेश ढमढेरे, अभिमन्यू लांडगे, अशोक गव्हाणे, भिकाजी बोकड, शोभा आवटे, मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, विभागीय अधिकारी संतोष पाचपुते, वसुली अधिकारी श्याम गावडे, शाखाधिकारी अजित गवळी, शशिकांत निसाळ, अर्जुन आढळराव, राहुल बांगर, शालिवान गव्हाणे, दत्ता लांडे, रामदास चासकर, अतुल गुंजाळ, सुजाता काळे, राखी वखारिया, प्रमोद हिंगे, राजेंद्र साळवे आदी उपस्थित होते.

श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ठेवींचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह १६ शाखा आहेत. लवकरच चाकण येथील नवीन शाखेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आढळराव पाटील यांनी या वेळी दिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.