पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नवी दिल्लीत घेतली भेट!!
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नवी दिल्लीत घेतली भेट!!
—–
भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे यांची मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नवी दिल्लीत भेट घेतली.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजूरी मिळावी यासाठी या भागाचे लोकसभेत तीनवेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यापासून म्हणजे सन २००४ पासून केंद्रीय पातळीपासून सर्व स्तरांवर या प्रकल्पासाठी आढळराव पाटील हे कसोशीने संघर्ष करीत आले आहेत. १५ वर्षाच्या त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात जवळजवळ सर्वच अधिवेशनात या विषयी लोकसभेत आढळराव पाटील यांनी आवाज उठविला आहे. त्यास सन २०१६ मध्ये यश येऊन तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पास मंजूरी दिली व कार्यान्वयासाठी ‘महारेल’कडे हा प्रकल्प हस्तांतरीत करण्यात आला.
महारेलकडून पुणे-नाशिक या २३५ किमी लांबीच्या सुमारे रू.१६०३९ कोटी रकमेच्या रेल्वे प्रकल्पाचे सेमी
हायस्पीड रेल्वेमध्ये समावेशन करण्यात आले. या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर आढळराव पाटील यांनी व्यक्तीशः लक्ष घालून पाठपुरावा केला असून यासाठी आवश्यक २० टक्के हिस्सा खर्च करण्यास राज्य शासनाची देखील मंजूरी मिळाली आहे.
भारतीय रेल्वे बोर्डानेदेखील या प्रकल्पास मंजूरी दिलेली असल्याने सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या कारणांमुळे हा प्रकल्प प्रक्रियेची गती मंदावल्याचे मा. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास आढळराव पाटील यांनी आणून दिले.
हा प्रकल्प झाल्यास महाराष्ट्र राज्यातील ऑटो हब म्हणून प्रसिध्द असलेल्या चाकण-खेड भागातील शेकडो कंपन्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील मालाची वाहतुक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक सुलभ
होईल. पुणे-नगर-नाशिक हे तीन महत्वाचे जिल्हे एकाचवेळी जोडले जाऊन वाहतुक कोंडीचा प्रश्नही बऱ्याच अंशी सुटून नागरिकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या व महाराष्ट्र शासनाने २० टक्के हिस्सा खर्च करण्यास मंजूरी दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणेकामी सत्वर कार्यवाहीचे आदेश व्हावेत यासाठी रावसाहेब दानवे यांच्याकडे आढळराव पाटील यांनी आग्रही मागणी केली.
आपण या प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी लक्ष घालून रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगून आढळराव पाटील यांना आश्वस्त केले.