राजवीर पब्लिक स्कूलचे आज वार्षिक स्नेहसंमेलन!!
राजवीर पब्लिक स्कूलचे आज वार्षिक स्नेहसंमेलन!!
कोल्हापूर प्रतिनिधी:
श्रीराम ज्ञानपीठ संचलित राजवीर पब्लिक स्कूल वाशी तालुका करवीर येथे 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाख्यात, नियोजनबद्ध व निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे.
वाशी परिसरात अतिशय कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर नाव लौकिक झालेल्या राजवीर पब्लिक स्कूलचे पूर्ण श्रेय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भीमराव पाटील सर, मुख्याध्यापिका प्रा.वैष्णवी सरनोबत, समन्वयक प्रा.शिवाजीराव बरगे, सचिव सागर पाटील व उपाध्यक्ष महादेव पाटील यांचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्य राखीव पोलीस दलाचे डी.वाय.एस.पी पी.आर.पाटील, प्रमुख उपस्थिती अनिता भीमराव पाटील(संचालिका भोगावती सह. साखर कारखाना), डॉ.सुरेश राठोड (कार्यकारी संपादक दैनिक रोखठोक) व अध्यक्ष विक्रम जरग (माजी महापौर को.म.न.पा.) आदी मान्यवरांच्या हस्ते राजवीर पब्लिक स्कूल वाशी 10 वे वार्षिक स्नेहसंमेलनची सुरुवात होणार आहे.