सामाजिक

भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप !!

1010907248

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली निमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन केले आहे. त्यानुसार शुक्रवार दि. २ ऑक्टोबर ते शनिवार दि. १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रु. २०/- प्रति किलो दराने गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
कारखान्यामार्फत मागील वर्षी सभासदांसाठी स्मार्ट साखर कार्ड विभागीय शेतकी कार्यालयामध्ये वाटप करणेत आलेली आहेत. तसेच हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांसाठी साखर कार्ड वाटपाचे काम संबंधित विभागीय शेतकी गट ऑफिसला चालू आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला साखर घेताना सभासद व ऊस उत्पादकांनी त्यांना दिलेले स्मार्ट कार्ड व ओळखीचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी साखर वाटप राहील. त्यामध्ये (१) पूर्ण शेअर्स (रक्कम रु. १५,०००/-) व ऊस पुरवठा केलेले – ८० किलो (२) फक्त पूर्ण शेअर्स (रक्कम रु. १५,०००/-) – ५० किलो (३) अपूर्ण शेअर्स रक्कम व ऊस पुरवठा केलेले – ४० किलो (४) फक्त ऊस पुरवठा केलेले – ४० किलो (५) फक्त अपूर्ण शेअर्स रक्कम जमा केलेले – ३० किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे.

1011106929
  • शुक्रवार दि. २ – पारगाव गटातील सर्व गावे,
  • शनिवार दि. ३ – पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील सर्व गावे,
  • रविवार दि. ४ – निरगुडसर गाव, कळंब व रांजणी गटातील सर्व गावे,
  • सोमवार दि. ५ – मंचर गटातील सर्व गावे,
  • मंगळवार दि. ६ – मंचर व अवसरी खुर्द गाव व घोडेगाव गटातील सर्व गावे,
  • बुधवार दि. ७ – टाकळी हाजी, कवठे व करंदी गटातील सर्व गावे,
  • गुरुवार दि. ८ – करंदी गटातील गावांसाठी गट ऑफिस,
  • शुक्रवार दि. ९ – जातेगाव, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव गट,
    ओझर, उंब्रज या गटातील गावांसाठी गट ऑफिस येथे,
    खोडद व पारगाव (मंगरूळ) गाव येथे,
    शनिवार दि. १० – जातेगाव बु, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव

अंतर्गत सबंधित साखर वाटप गावांसाठी गट ऑफिस येथे व
खेड गटातील गावांसाठी मार्केट यार्ड खेड येथे,

जे सभासद / ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आपआपले गावामधून साखर घेवू शकणार नाहीत त्यांना साखर रविवार दि. ११ ऑक्टोबर ते बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीमध्ये कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाटप केली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२७ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे. तरी वरील नमूद तारखेला सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेवून जाणेचे सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 390586

Related posts

लोणी (धामणी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला बाल आनंद मेळावा !!

Chief Editor

जऊळके बुद्रुक येथे ठाकर समाजतील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या ; मुद्रांक व नोंदणी विभागातील तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ !!

Chief Editor

Leave a Comment