सामाजिक

जागतिक आदिवासी दिन जांभोरी येथे उत्साहात साजरा !!

1010503738
1010503746

पंचनामा प्रतिनिधी – आज दि.9 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक आदिवासी दिन जांभोरी गावात उत्साहात साजरा करण्यात आला.

1010503741

दूध डेअरी ते जांभोरी गावठाण या ठिकाणी जांभोरी गावचे सुपुत्र लायन हार्टेड होनाजी केंगले,आदिवासी समाजाचे पहिले सभापती पंचायत समिती आंबेगाव निसर्गवासी शंकर विठू केंगले यांच्या स्मारकाचे पुजन करण्यात आले. जांभोरी ग्रामविकास फाउंडेशन कार्यालय जांभोरी या ठिकाणी लायन हार्टेड आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले. राघोजी भांगरे,बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या वेळी जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी,पोलीस पाटील सोनाली पोटे,पोलीस पाटील नवनाथ केंगले,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शामराव बांबळे, मंचर नगरपरिषदेचे नगरसेवक लखनदादा पारधी, युवानेते मारुती दादा केंगले,बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे,ग्रामपंचायत सदस्य लताबाई केंगले,संजय केंगले गुरुजी, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे,पेसा अध्यक्ष मारुती केंगले. किसन शेळके,सुमित्रा केंगले,पुष्पा केंगले,अंकुश गिरंगे,निवृत्ती केंगले, प्राध्यापक अक्षय साळवे,प्रकाश केंगले,रोहित केंगले व जांभोरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी प्राध्यापक अक्षय साळवे यांचे व्याख्यान मनोगत संपन्न झाले.

1010503739

जांभोरी हि आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी आहे.1875-76 मध्ये इंग्रज सावकारशाही विरुद्ध बंड करण्यात आला आणि गोरगरीब जनतेच्या जमिनी परत मिळून दिल्या. हत्तीचंद गुप्तचंद इंग्रज सावकारशाहीची नाके कापण्यात आली.जांभोरी गावात महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले आहे.दिलीपराव वळसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत सुचना देण्यात केल्या असून डीपीआर बनवुन ठेवला आहे अशी माहिती युवानेते मारुती दादा केंगले यांनी दिली.

1010489686
1010480394
1010498759

Related posts

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे धर्मनाथ महाराजांच्या (बीज) यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न!!

Chief Editor

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

गुरु पौणिमेला धामणीत खंडोबाला फुलांची सजावट !!

Chief Editor

Leave a Comment