सामाजिक

समर्थ क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न ; सहा गटांत ५१४ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग !!

1011335514

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हेच्या, समर्थ क्रीडा संकुल येथे पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला – मुलींच्या सहा गटांत एकूण ५१४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, एकाग्रता आणि अचूकतेच्या जोरावर स्पर्धेत रंगत निर्माण केली.

स्पर्धेचे उद्घाटन समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे तसेच क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत झाले. शालेय स्तरावरील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या सहाही गटांमध्ये खेळाडूंनी चुरशीच्या लढती दिल्या. कॅरमसारख्या खेळातून विद्यार्थ्यांची एकाग्रता, निर्णयक्षमता, संयम आणि अचूकतेचा विकास होतो. या स्पर्धेतील मोठ्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक असलेली आवड अधोरेखित झाली.

स्पर्धेचा गटनिहाय अंतिम निकाल
१४ वर्षांखालील मुलांचा गट
प्रथम क्रमांक : रुद्र बंदिष्टी –दौंड
द्वितीय क्रमांक : रुद्र कदम –जुन्नर
तृतीय क्रमांक : शिखर अमोल आनंदराव – जुन्नर
१४ वर्षांखालील मुलींचा गट
प्रथम क्रमांक : कार्तिकी गंभीर – जुन्नर
द्वितीय क्रमांक : इकरा शेख –शिरूर
तृतीय क्रमांक : सारा भोजने – जुन्नर
१७ वर्षांखालील मुलांचा गट
प्रथम क्रमांक : सोहम जाधव – शिरूर
द्वितीय क्रमांक : हरिओम विघे – भोर
तृतीय क्रमांक : सर्वेश खराडे – शिरूर.
१७ वर्षांखालील मुलींचा गट
प्रथम क्रमांक : सिद्धी गुंडाळ – खेड.
द्वितीय क्रमांक : समीक्षा भोरडे – भोर
तृतीय क्रमांक : जान्हवी शिंदे – जुन्नर.
१९ वर्षांखालील मुलांचा गट
प्रथम क्रमांक : अभिजीत मुळे – जुन्नर.
द्वितीय क्रमांक : ब्रह्मनाथ जाधव – जुन्नर.
तृतीय क्रमांक : अथर्व कवडे –जुन्नर.
१९ वर्षांखालील मुलींचा गट
प्रथम क्रमांक : श्रेया वायकर –जुन्नर.
द्वितीय क्रमांक : इरम अब्दुल अन्सारी – जुन्नर.
तृतीय क्रमांक : काव्यांजली भोर – जुन्नर.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना समर्थ संस्थेचे सचिव विवेक शेळके आणि विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि क्रीडानैपुण्याचे कौतुक करण्यात आले.

जिल्हास्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन समर्थ क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि अश्विनी जगदाळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संबंधित क्रीडा शिक्षक, आयोजक आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

1011291568
1011298056
img 20261016 wa1042

Related posts

ग्रामपंचायत जवळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

विठुरायाच्या पंढरीच्या सेवेचे वारकरी : राजेंद्र शेळके

Chief Editor

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळ जाणवायला लागला!!

Chief Editor

Leave a Comment