सामाजिक

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि समस्थ ग्रामस्थ शिरदाळे यांच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला संपन्न !!

1010158070
1010158070

पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि समस्थ ग्रामस्थ शिरदाळे यांच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिरदाळे गावाला एक ऐताहासिक देणगी लाभलेली आहे ती म्हणजे गावालगतच असणारा तलाव !! हा तलाव गावची ३६५ दिवस
तहान भागवत असतो, या तलावाचे सुशोभीकरण व्हावे या दृष्टीने गावातील अनेक तरुणांनी एकत्र येऊन वृक्षरोपण नियोजन केले होते.

या कार्यक्रमाला शिवऋण महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षयजी बोऱ्हाडे, दै. सामनाचे उपसंपादक मा.श्री. विठठ्लरावजी जाधव, मा.श्री. बाबाजीदादा चासकर ( अध्यक्ष हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. चंद्रकांतजी जाधव ( सामाजिक कार्यकर्ते) , मा. सरपंच सागर जाधव पाटील, दै. प्रभातचे पत्रकार मा. श्री. अंकुशजी भुमकर त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ आणि तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्ये ठरले ते म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा प्रत्येकी एक रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे या गावालगतच धामणी येथील खंडोबाचे मूळस्थान म्हणून सागदरा आहे, या सागदऱ्यामध्ये ऐतिहासिक अस खंडोबाच स्थान असून येथे चंपाषष्ठी उत्सव असेल किंवा यात्रा काळात भाविक ये जा करत असतात परंतु हा भाग खोल दरीत असल्यामुळे भाविकांची ये जा करण्यासाठी अडचण होत होती ही अडचण लक्षात घेऊन गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनि पुढाकार घेऊन अनेक तरूणांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे महिलाभगिनांच्या मदतीने सुंदर असा रस्ता बनवला आहे त्यांचा या कार्याचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृक्षवल्ली सोयरे ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

Related posts

वृक्षवल्ली मित्र परिवारातर्फे शिरदाळे येथे १०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण !!

Chief Editor

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

Chief Editor

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील पक्षीप्रेमी प्रदिप आदक यांनी पक्ष्यांसाठी बसवले बर्ड फूड फिडर !!

Chief Editor

Leave a Comment