सामाजिक

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथे आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !!

img 20260503 wa0617

पंचनामा प्रतिनिधी – पतसंस्था हि शिक्षकांची पगारधारांची पतसंस्था आहे.अडचणीच्या वेळी हि पतसंस्था शिक्षकांना आर्थिक पाठबळ देते,संस्थेचे कामकाज चांगले असल्यामुळे सभासदांना त्यांचा फायदा होतो असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दिनेश ढोबळे यांनी केले.

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथे आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष पाहूणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे सचिव प्रकाश तापकीर यांनी अहवाल वाचन करून सभासदांच्या प्रश्नांचे निरसन केले.त्यांना सहसचिव तानाजी रोकडे यांनी सहकार्य केले.यावेळी सभासंदाना संस्थेच्या वतीने कोणीतीच अडचण येणार नाही. याची काळजी घेतली जाते.आपली संस्था तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था असून नेहमीच सभासदांच्या हिताचा विचार केला जातो.दरवर्षी संस्थेला ” ऑडिट वर्ग-अ ” मिळत आहे.असे संस्थेच्या नूतन अध्यक्षा वैशाली काळे यांनी सांगितले.

img 20260503 wa0620

यावेळी संस्थेच्या वतीने विविध विद्यालयातील सेवा निवृत होणार्या शिक्षक व सभासदांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य कांताराम टाव्हरे, मुख्याध्यापक सुनिल वळसे पाटील,अविनाश ठाकूर,दत्तात्रय काळे व संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण गोरडे यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्याक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले.

img 20260417 wa0340
fb img 1774661449199

Related posts

धामणी नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी शताब्दी महोत्सव ; आठ दिवस भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन; नामवंत कीर्तनकारांची किर्तन सेवा होणार संपन्न !!

Chief Editor

तमाशाकडे पाहण्याचा रसिक मायबापांचा दृष्टिकोन चांगला; तमाशा कलेवर रसिकांचे आजही प्रेम !!

Chief Editor

शरद सहकारी बँकेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी विठ्ठल सिताराम ढोबळे यांचा सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment