सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी ) येथे जलतारा प्रबोधन कार्यशाळा संपन्न !!

img 20260503 wa0518(1)
img 20260503 wa0518(1)

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथे लोणी ग्रामस्थांतर्फे, ग्रामपंचायत लोणी, आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने जलतारा प्रबोधन कार्यशाळा संपन्न झाली.

दुष्काळी भागातील आपल्या शेतीमध्ये बाराही महिने पाणी कसे राहील? व पाण्याची संवर्धन कसे होईल, किती खर्च येईल, तसेच प्रत्यक्ष फायदे, शुद्ध पाणी आणि उत्तम आरोग्य यांचा परस्पर संबंध अतिशय सोप्या भाषेत सांगितले.जमिनीतील भूजल पातळी वाढल्यामुळे पिकांना नैसर्गिक खनिजयुक्त पाणी कसे मिळते आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो याबाबत तांत्रिक माहिती व मार्गदर्शन प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम वायाळ जलतारा जनक व संशोधक, जलतारा प्रकल्प समन्वयक, सदस्य आदर्श गाव समिती महाराष्ट्र राज्य, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सदस्य,महाराष्ट्र शासन प्रशिक्षक व मार्गदर्शक यांनी कार्यशाळेत केले.

लोणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ जलताराच्या कार्यशाळे साठी हजर होते.लोकनियुक्त सरपंच डॉ.सावळाभाऊ नाईक, उपसरपंच राजेंद्र वाळुंज पाटील , पोलीस पाटील संदीप आढाव, मा.सरपंच उद्धवराव लंके,मा.सरपंच दिलीप वाळुंज, वाळुंजनगरचे मा.सरपंच शरद वाळुंज, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा वाळुंज,माजी उपसरपंच प्रकाश गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जयवंत रोकडे, जनकल्याण पतसंस्थेचे संचालक प्रदीप कोचर,आंबेगाव तालुका दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शिनलकर,शिवाजीनाना शिनलकर, व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ,शेतकरी हजर होते.मा.सरपंच उद्धवराव लंके यांनी आभार मानले.

img 20260417 wa0340
fb img 1774661449199

Related posts

नाशिक पोलीस दलातून श्वान निताची सेवापूर्ती !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथे पाण्याचा टँकर सुरू !!

Chief Editor

Leave a Comment