सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार !!

img 20260327 wa0411
img 20260327 wa0411

पंचनामा प्रतिनिधी – लाखनगाव (ता.आंबेगाव ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू. ही घटना बुधवार ( ता. २५ ) पहाटेच्या सुमारास घडली. येथील शेतकरी ज्ञानेश्वर ( माऊली ) पाटील यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.गोठ्याच्या खाली असलेल्या फटीतून बिबट्याने पंजा घालून वासराला जखमी केल्याने वासराचा मृत्यू झाला.

माऊली पाटील यांच्या घराच्या चहू बाजूने बिबट्याने वासराला फरफटत नेले फणलेले मोकळे शेत, कांद्याचे शेत व मेथी घासातून फरपटत अंदाजे एक किलोमीटर पर्यंत असणाऱ्या बेबी कॉर्न मक्याच्या शेतात वासराचा फडशा पाडला. परिसरातील परिस्थिती आणि वासराला ओढून नेल्याच्या खुणांवरून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खात्री झाली आहे.

वनविभाग कर्मचारी पूजा कांबळे व अशोक जाधव यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तीन-चार महिन्याच्या विश्रांतीनंतर लाखनगाव व परिसरातील ही पहिलीच घटना आहे. घराजवळून वासरू नेल्याने मानवी हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. याचा गांभीर्याने विचार करून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशाल मिंडे, व संदीप पाटील यांनी केली आहे.

fb img 1773887073740

Related posts

समर्थ गुरुकुल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न ; ४३७ विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे रविवार दि.१ फेब्रुवारी व सोमवार दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवाचा यात्रोत्सव!!

Chief Editor

पंचनामा विशेष – ३ मे आंतरराष्ट्रीय बिबट दिन !!

Chief Editor

Leave a Comment