सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे महिलांसाठी कौशल्य विकास योजने अंतर्गत आरी प्रशिक्षण संपन्न !!

img 20260109 wa0646
img 20260109 wa0648

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या आणि गावच्या सर्वांगिनी विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या ग्रामपंचायत जवळे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायतराज अभियान निमित्त १५ वा वित्त आयोग निधी मधून महिलांसाठी कौशल्य विकास योजने अंतर्गत आरी वर्क प्रशिक्षण देण्यात आले.

पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,यशदाचे ट्रेनर श्री.वामन बाजारे ,सौ.पवार मॅडम यांनी उत्कृष्ट अशी कलाकृती महिलांना दहा दिवस शिकवण्याचे काम केलं.यामधून महिला सक्षमीकरण करण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचं जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी सांगितले.

img 20260109 wa0645

गेली दहा दिवसांमध्ये केलेल्या कामाच्या डिझाईन पाहून कल्पना खालकर यांना प्रथम क्रमांक देण्यात आला.नयन खालकर द्वितीय क्रमांक, मोनिका गावडे तृतीय क्रमांक,अश्विनी वाघ उत्तेजनार्थ याप्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचा समारोप करत असताना या ठिकाणी आदर्श सरपंच वृषाली ताई शिंदे, शुभांगी खालकर, हरिचंद्र शिंदे,उत्तम शिंदे पाटील,पंढरीनाथ टाव्हारे, राजेंद्र वाळुंज,महादेव शिंदे अशोक लोखंडे, भूपेंद्र वाळुंज यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे यांनी दिली.

img 20260108 wa0203

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा !!

Chief Editor

लोणी (धामणी ) मध्ये भगवान महावीर कल्याणक जयंती संपन्न !!

Chief Editor

निरगुडसर परिसरात रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांना सहन करावा लागतोय मनःस्ताप !!

Chief Editor

Leave a Comment