सामाजिक

समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा !!

1010902848

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय व रिसर्च सेंटर, बेल्हे येथे ‘संस्कृत ज्ञानान्वेषणम्’ या संस्कृत क्लबचे उद्घाटन तसेच संस्कृत दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आयुर्वेद शिक्षणात संस्कृत भाषेला असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञानपरंपरेशी त्यांची नाळ अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. रमेश पाडेकर होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय लोंढे, बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब भुतकर, यशवंत फापाळे, डॉ. श्रवंती तोंडशिरकर, डॉ. जयश्री मते, डॉ. स्नेहल गायकवाड, डॉ. कृतिका कांबळे आणि डॉ. मधुसूदन कुऱ्हाडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक, सुभाषिते व संस्कृत भाषणे सादर केली. विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृत भाषेचे महत्त्व तसेच भारतीय संस्कृतीचे विविध पैलू प्रभावीपणे मांडण्यात आले.

  कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते महाकवी भासवि रचित ‘मध्यम व्यायोग’ या संस्कृत नाटकाचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनयातून संस्कृत साहित्याची समृद्धता आणि प्राचीन भारतीय नाट्यपरंपरेचे दर्शन घडविले.

 यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.पाडेकर यांनी संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून भारतीय ज्ञानपरंपरेचा महत्त्वपूर्ण आधार असल्याचे सांगितले. आयुर्वेदातील अनेक मूलग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘संस्कृत ज्ञानान्वेषणम्’ या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा, साहित्य, श्लोक, सुभाषिते आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

  कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापिका मानसी गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्कृत दिनाचा कार्यक्रम आनंददायी वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
1010891586
file 000000003e9c821182ea0c832397afbf
1010908108

Related posts

पारगाव (शिंगवे ) येथील विद्युत वाहक खांब बनले आहेत धोकादायक !!

Chief Editor

अंगणवाडीतील आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही ; सरकार ॲक्शन मोडमध्ये – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे कडक निर्देश !!

Chief Editor

पंचनामा विशेष – जागतिक कोल्हा दिन !!

Chief Editor

Leave a Comment