आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

धामणी (ता.आंबेगाव) च्या शिरपेचात मानाचा तुरा!!पै.सोहम भरत साळुंखे याची युवा महाराष्ट्र केसरी साठी निवड!!

पै.सोहम साळुंखे याची युवा महाराष्ट्र केसरी साठी निवड!!

धामणी(ता.आंबेगाव) येथील व सध्या पुणे येथे शिक्षणासाठी असणाऱ्या पै.सोहम भरत साळुंखे या विद्यार्थ्याने ४८kg वजनी गटात युवा महाराष्ट्र केसरी पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. गेल्याच आठवड्यात पै.निखिल वाघ याची महाराष्ट्र केसरी साठी झालेली निवड आणि त्याच प्रेरणेतून युवा महाराष्ट्र केसरीसाठी झालेली सोहम याची निवड या दोन्ही गोष्टी शिरदाळे,धामणी,पहाडदरा गावांच्या अभिमानाचा भर घालणारा आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि कुस्ती सारख्या खेळात ग्रामीण युवकांचा सहभाग वाढत राहील हे नक्की.
या दोनही पैलवान आणि त्यांच्या वास्तदांचे कौतुक परिसरातून होत आहे. तसेच धामणी गावच्या नवनियुक्त सरपंच सौ.रेश्मा अजित बोऱ्हाडे,शिरदाळे उपसरपंच श्री.मयुर सरडे, सोसायटी संचालक दीपक जाधव यांनी या दोन्ही पैलवानाचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या…

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.