आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

राजगुरूनगर बँकेचे माजी अध्यक्ष अशोकशेठ भुजबळ यांची बाळासाहेबांची शिवसेना पुणे जिल्हा संघटक प्रमुखपदी निवड!!

राजगुरूनगर बँकेचे माजी अध्यक्ष अशोकशेठ भुजबळ यांची बाळासाहेबांची शिवसेना पुणे जिल्हा संघटक प्रमुखपदी निवड!!

खेड तालुक्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि राजगुरूनगर बँकेचे माजी अध्यक्ष अशोकशेठ भुजबळ यांची बाळासाहेबांची शिवसेना पुणे जिल्हा संघटक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी(ता.आंबेगाव) येथील जनता दरबारात नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, युवासेना खेड तालुकाप्रमुख विशाल पोतले, खेड तालुका समन्वयक अमोल इंगळे, संदीप काचोळे, किशोर गोरे, मयूर तोत्रे, गोरख बच्चे, दत्तात्रय राऊत, शंकर राक्षे, सचिन चौधरी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अशोक भुजबळ यांचा जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क पक्षवाढीसाठी फायद्याचा ठरेल अशी भावना यावेळी मा.खा.शिवाजीराव आढळराव यांनी या वेळी व्यक्त केली.

या प्रसंगी बोलताना अशोक भुजबळ म्हणाले की, पक्षाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांचे संघटनात्मक काम करणार आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.