आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

खडकवाडी (ता.आंबेगाव )चा समीर भागवत देशात प्रथम क्रमांकाने झाला उत्तीर्ण!!

खडकवाडीचा समीर भागवत देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण!!

खडकवाडी ( ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील समीर किसन भागवत हे केंद्रीय अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून ( आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण भारत सरकार ) देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. समीरचेे वडील किसन नानाभाऊ भागवत शेती व दुग्ध व्यवसाय करत असून त्यांनी आपल्या मुलाला उच्चशिक्षित केले आहे मुलाने त्यांच्या कष्टाची चीज केले. समीरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवाडी, व माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय आणि जुनियर कॉलेज धामणी या ठिकाणी झाले. समीरने बी.टेक ( डेअरी टेक्नॉलॉजी ) महाराष्ट्र पशु व मच्छ विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे केले आहे तर एम.टेक ( डेअरी टेक्नॉलॉजी ) राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल हरियाणा येथे केले आहे

मागील चार वर्षापासून गुजरात सहकारी दुग्ध वितरण संघ लिमिटेड, अमोल मध्ये कार्यकारी अधिकारी ( गुणवत्ता विभाग )पदा व कार्यरत आहे समीरने नोकरी करत असताना

केंद्रीय अन्नसुरक्षा अधिकारी – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ( भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण ) भारत सरकार यांच्या प्राथमिक परीक्षा 30 मार्च 2022 व मुख्य परीक्षा एक ऑक्टोबर 2022 या परीक्षेसाठी देशातून 40,000 परीक्षार्थी बसले होते. त्यातून समीर भागवत यांचा प्रथम क्रमांक आला. आई-वडील शेतकरी असून शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगले यश मिळवल्याने लोणी धामणी जारकरवाडी परिसरातून समीरचे कौतुक होत आहे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी फोनवरून समीरचे कौतुक केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.