शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर लोकसभा युवासेना पदाधिकारी, युवसैनिक यांची बैठक संपन्न!!
मंचर प्रतिनिधी – बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना सचिव किरण साळी व युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लांडेवाडी, तालुका – आंबेगाव येथे उत्साहात संपन्न झाली.
यावेळी बापूसाहेब शिंदे यांचेवर शिरूर – हवेली व हडपसर विधानसभा मतदार संघ तसेच धनंजय पठारे यांचेवर खेड – आळंदी व भोसरी विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रासाठी युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून नेमणुकीचे पत्र शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
बैठक प्रसंगी शिरूर लोकसभा मतदार संघातील युवासेनेच्या संघटनात्मक कामकाजाचा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आढावा घेऊन आगामी काळात शाखा व महाविद्यालयीन स्तरापर्यंत युवासेनेची बांधणी करण्याबाबत युवासेना पदाधिकारी यांना आदेश दिले. तसेच यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन मेळावे घेण्याचे निहाय नियोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.