आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ टोयोटा केंद्र कौशल्य स्पर्धेत यशस्वी!!

समर्थ टोयोटा केंद्र कौशल्य स्पर्धेत यशस्वी!!

समर्थ टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रातील बॉडी टेक्निशियन विभागाचा विद्यार्थी अभिषेक औटी आणि पेंट टेक्निशियन विभागाचा विद्यार्थी तुषार गवांदे यांनी टोयोटा किर्लोस्कर मोटार लिमिटेड यांनी आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय स्किल कॉन्टेस्ट (कौशल्य स्पर्धेत) यश संपादन केल्याची माहिती, प्राचार्य श्री.पांडुरंग हाडवळे यांनी दिली.

टोयोटा किर्लोस्कर मोटार लिमिटेड आणि समर्थ औद्योगिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे कौशल्य विकास केंद्र चालविले जाते. यामध्ये ऑटो बॉडी टेक्निशियन या अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरी प्राप्त होत असते. पेंट टेक्निशियन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तुषार गवांदे याने पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये की जी महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यासाठी आयोजित केली होती त्यामधील पेंट टेक्निशियन विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. बॉडी टेक्निशियन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अभिषेक औटी याने बॉडी टेक्निशियन विभागात तृतीय क्रमांक प्राप्त केला. तळेगाव या ठिकाणी संपन्न झालेल्या या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश मिनान (वाईस प्रेसिडेंट टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेड), रवी प्रकाश सोनटक्के (डेप्युटी जनरल मॅनेजर), आर. एम. प्रशांत (मुंबई एरिया मॅनेजर) के. महेश , सचिन अत्रे (गुजरात एरिया मॅनेजर), श्री.संदीप पवार इत्यादी मान्यवर तसेच पश्चिम विभागातील तीन राज्यातील सर्व डीलर व डीलर मॅनेजमेंट टीम उपस्थित होती. तसेच समर्थ टोयोटा केंद्रातील माजी विद्यार्थी विजय अनिल गोडसे याची नुकतीच टोयोटा किर्लोस्कर प्रशिक्षण केंद्र पश्चिम विभाग या ठिकाणी प्रशिक्षक पदी निवड झाली. या विद्यार्थ्याचे ऑटोमोटिव्ह बॉडी अँड पेंट रिपेअर यातील कौशल्य पाहता एक वर्षाच्या आतच त्याची प्रशिक्षक पदी निवड झाली ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

समर्थ टोयोटा केंद्रातील या विद्यार्थ्यांना श्री.विष्णू मापारी, श्री.स्वप्निल कवडे आणि श्री.रोहित गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंतराव शेळके, उपाध्यक्ष श्री.माऊलीशेठ शेळके, सचिव श्री.विवेक शेळके, विश्वस्त श्री.वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी अभिनंदन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.