आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

भैरवनाथ पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ २०२४ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान!!

भैरवनाथ पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ २०२४ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान!!

मा.खा. शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील संस्थापक,अध्यक्ष असणाऱ्या भैरवनाथ पतसंस्थेला पतसंस्था चळवळीत दिशादर्शक काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.

शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार श्री.भाऊसाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रमेश खरमाळे व संस्थेचे पदाधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे होते.

संस्थेकडे आज अखेर एकूण ४५५ कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेने ३५६ कोटींचे कर्जवाटप केलेली आहे. केवळ नफा कमवणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. छोट्या मोठ्या व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी अत्यल्प व्याजदराने वित्त पुरवठा केलेला आहे.

संस्थेच्या मुख्यालयासह १७ शाखा कार्यरत आहेत.संस्थेचे सर्व व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत.

मा.खा.शिवाजीराव(दादा)आढळराव पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने चालू आर्थिक वर्षात ५०० कोटींच्या ठेवी व ४०० कोटींचे कर्ज वाटपाचे ध्येय ठेवले असल्याची माहिती संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश खरमाळे यांनी दिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.