काठापूर बुद्रुक येथे पुन्हा एकदा शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला लागली आग!!
मागील पाच दिवसात तिसरी तर महिनाभरातील ही चौथी घटना!!
काठापूर बुद्रुक येथे पुन्हा एकदा शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला लागली आग!!
मागील पाच दिवसात तिसरी तर महिनाभरातील ही चौथी घटना!!
काठापूर बुद्रुक येथे पुन्हा एकदा शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला आग लागली आहे.लागलेल्या आगीत पांडुरंग सिताराम करंडे यांचा सव्वा एकर ऊस जळाला असून ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे.
मागील पाच दिवसात तिसरी तर महिनाभरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे काठापूर बुद्रुक मध्ये विजेच्या तारांमुळे उस जळण्याचे वाढलेले प्रमाणाने येथील ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला असून वीज वितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात गावातील सर्वच विज वाहक तारा आणि खांब यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
काठापूर बुद्रुक गावातील गट नंबर 89 मध्ये 50 गुंठे क्षेत्रावर पांडुरंग सिताराम करंडे यांनी ऊस पिकाची लागवड केली होती. या उसाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे उस जळून गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजून एक महिनाभर कारखाने सुरू होणार नाही त्यामुळे हा ऊस तोडून ही जाणार नाही .परिणामी एक महिन्यात ऊस वाळून जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होनार आहे.
एकंदरीत काठापुर बुद्रुक गावातील असणारे खांब व त्यामधील मधील जास्त अंतर त्यामुळे पडलेले झोळ तसेच मोठ्या संख्येने असनारे विजेचे खांब व विजेच्या तारांची मोठ्या प्रमाणावर असलेले संख्या यामुळे अपघात होत असतात. परंतु मागील पाच दिवसात तिसरी घटना झाल्याने नक्की वीज पुरवठा होत असताना तांत्रिक बिघाड तर होत नाही ना?अशी शंका नागरिकांना येत आहे. कारण लाईट जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.
सध्यातरी ऊस जळण्याचे प्रमाण वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.काठापुर बुद्रुक बारमाही बागायती गाव असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाची शेती केली जाते. त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. परंतु मागील पाच दिवसात तिसरी तर महिन्यातील चौथी घटना असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
वीज वितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात काठापुर गावात सर्वेक्षण करून विजेच्या तारांची उंची वाढवावी ज्या ठिकाणी खांब यातील अंतर जास्त आहे तेथे नवीन खांब बसवावे जर वीज वितरण कंपनीने यावर तोडगा काढला नाही तर काठापूर बुद्रुक ग्रामस्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने वीज कंपनीवर मोर्चा देण्यात येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.
सदर ठिकाणी सरपंच अशोक करंडे, मा. उपसरपंच विशाल करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे,यांनी भेट दिली.उस उत्पादक शेतकरी पांडुरंग करंडे व नवनाथ करंडे यांनी संबंधित विभागाने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.