बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच!!
लोणी (धामणी) हद्दीत चारचाकी वाहनांच्या पुन्हा एकदा अपघात !!
बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच!!
लोणी-धामणी- बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून लोणी ( ता.आंबेगाव ) येथील लोणी पाबळ रस्त्यावर चिंध्यादेव येथे पाबळच्या बाजुने टाटा टिगोर कार (एमएच-४६, बीके-१३९० ) लोणीच्या दिशेने येत होती.तर त्याच वेळेस मारूती इरटिका ( एमएच-१४, जेआर-०१०३) पाबळच्या दिशेने जात असताना रविवार (दि.०३) रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान चिंध्यादेव येथे हुलकावणी देण्याच्या नाधात दोन्ही कार समोरा समोर जोरात धडकल्याने दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला पल्टी झाल्या.
यामध्ये इरटिका कारमध्ये फक्त कारचालक तर टाटा टिंगोर मध्ये पती पत्नी व त्यांचा मूलगा प्रवास करत होते.या अपघातग्रस्त कार मधील चौघांनाही खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके,लोणीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ,सोमनाथ वाळूंज,हनुमंत थोरात,संभाजी पडवळ यांनी तातडीने अपघातग्रस्ताना लोणी येथील दवाखान्यात त्वरीत दाखल केले. पल्टी झालेल्या दोन्ही कारमधील कोणालाच सुदैवाने जीवितहानी झाली नाही.परंतु दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात अनेकांना प्राण गमावले लागले आहेत.अपघाताची संख्या कमी करण्यासाठी आरटीओ विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत येथील ग्रामस्थांनी व्यक्त करत आहे.
लोणी (ता.आंबेगाव) येथे लोणी पाबळ रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहान.