ब्रह्माकुमारी संस्थेत विद्यार्थ्यांसाठी बाल संस्कार शिबिर संपन्न !!


पंचनामा नाशिक प्रतिनिधी – नाशिक येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या सुचिता नगर मुंबई नाका स्थित सेवा केंद्रात दिनांक 9 ते 12 मे रोजी 8 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून तसेच विद्यार्थ्यांनी ओंकार ध्वनी करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री निलेश तिवारी व निवृत्त मुख्याध्यापक माधव पगार सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रह्माकुमारी विणादिदी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्माकुमारी कावेरी दीदी यांनी केले तर सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी उज्वला दीदी यांनी केले.
आपल्या वक्तव्यात प्रमुख पाहुणे निलेश तिवारी यांनी सांगितले की व्यक्तीला सुखी जीवन जगायचे असल्यास संस्कारात कामी येतात. हे संस्कार मात्र लहानपणापासूनच रुजवणे आवश्यक असते. अशा प्रकारचे संस्कार मेडिटेशन, ध्यान, संगीत इत्यादी द्वारे विदेशात बालपणापासूनच शाळांमधून देण्यात येतात. आपल्याकडे मात्र अशा संस्कारांची उणीव दिसते. मात्र अशा प्रकारच्या शिबिरातून आपल्याकडेही मुलांमध्ये संस्कार रुजवणे संस्कारांची जपणूक होते हा ब्रह्मकुमारी संस्थेचा स्तुत्य उपक्रम आहे. अशा प्रकारचा उपक्रम आमच्याही शाळेत केल्यास आम्हाला मनस्वी आनंद होईल असे मनोगत तिवारी यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
सटाणा नामपुर चे निवृत्त मुख्याध्यापक माधव पगार सर हे ब्रह्मकुमारी संस्थेचे नियमित साधक असून त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, राजयोग मेडिटेशन हा आपल्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा राजयोगाचा अभ्यास मी माझ्या जीवनात नित्यनियमाने करतो व माझ्या विद्यार्थ्यांनाही मी राजयोग मेडिटेश चे महत्त्व सांगतो. या मेडिटेशन द्वारे आपल्या जीवनातील ताणतणाव हा नाहीसा होतो, अभ्यासात एकाग्रचित्त होते त्यामुळे या ठिकाणी शिकवण्यात येणाऱ्या मेडिटेशन कडे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगले निर्णय घेण्यासाठी मदत होऊ शकते . त्यामुळे या शिबिरात शिकवण्यात येणाऱ्या संस्कार गोष्टी आत्मसात करा असे आवाहन श्री माधव पगार यांनी याप्रसंगी दिले
ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात सांगितले की मोठ्या नोकऱ्यांमध्ये लागताना आपल्याला पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्यावर रुजवण्यात आलेले संस्कारात कसे कामी येतात याचे उदाहरण बोधकथेतून स्पष्ट केले. जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्यावर रुजवण्यात आलेले संस्कारच कामी येतात यातून मनुष्याचे सर्वांगीण विकास हा होऊ शकतो असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी यावेळी केले.
प्रथम दिवसाच्या राजयोग सत्रात ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी विद्यार्थ्यांना स्व अनुभूती करून देत आपण कोण असून आपले जीवनातील उद्दिष्ट काय आहे, याविषयी विस्तृत माहिती दिली. व मोबाईलचे व्यसन पासून वाचण्यासाठी राजयोग मेडिटेशन कसा उपयोगी होऊ शकतो हे प्रॅक्टिकल मेडिटेशन द्वारे सांगितले.
दिनांक 11 मे रोजी डॉक्टर राजेश जावळे यांनी हेल्दी लाईफस्टाईल अर्थात शुद्ध आहार विहार याविषयी वक्तव्य देताना विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टींद्वारे आपले जेवण कसे शुद्ध पोषक असावे, सुदृढ जीवनशैली कशी जोपासावी असे डॉक्टर जावळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले यात एंजल ग्रुप 8 ते अकरा वयोगटातील व डायमंड ग्रुप 12 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांचा तयार करण्यात आला यातून त्यांना स्वच्छ भारत अभियान आवडणारे कार्टून कॅरेक्टर अशी विविध विषय देऊन चित्र काढण्यास सांगितले.
प्रत्येक सेशनच्या शेवटी ब्रह्माकुमारी कावेरी दीदी यांनी विद्यार्थ्यांना म्युझिकल एक्झरसाइज सुद्धा शिकवली
स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये बीके दिपाली बहन यांच्या अध्यक्षतेखाली लेमन स्पून रेस व म्युझिकल चेअर स्पर्धा घेण्यात आली.
या शिबिराच्या शेवटच्या सेशनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लेखिका, सायकलिस्ट व तितकीच जबाबदार गृहिणी श्रीमती प्रतिभा पाटील पाहुणे उपस्थित होते.
एंजल व डायमंड ग्रुप मधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मरण चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यात चित्रकला स्पर्धेत डायमंड गटातून आराध्य गांगुर्डे. ने तर एंजल गटातून स्वरा शिरसाट यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांकासाठी डायमंड ग्रुपचे नताली पाटील तर एंजल ग्रुपचे काव्या देवरे यांनी बाजी मारली
लिंबू चमचा मध्ये डायमंड ग्रुप च्या अनुष्का चौधरी यांनी तर
एंजल ग्रुप च्या यशिका पीचा या विद्यार्थ्यांनी प्रथम बक्षीस मिळविले. तर द्वितीय विजेते डायमंड ग्रुप करीना सिंगयांनी एंजल ग्रुप अभिश्री माळी हे होते
संगीत खुर्ची या खेळ प्रकारात एंजल ग्रुपचे प्रथम विजेते स्वर श्री जाधव. तर द्वितीय विजेते अभी श्री माळी होते तसेच डायमंड ग्रुपचे प्रथम विजेते गार्गी खैरनार तर द्वितीय विजेते आरव पाठक होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित सोनी गिफ्ट तर्फे भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता ब्रह्माकुमार दिलीप भाई यांच्या होंगे कामयाब एक दिन….. या स्फूर्ती गीताने करण्यात आली. शिबिरात दीडशे विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र ही देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंबई नाका सेवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम केले.

