भीमाशंकर कारखाना येथील ऊसतोडणी कामगार बजावणार मतदानाचा हक्क!!
भीमाशंकर कारखाना येथील ऊसतोडणी कामगार बजावणार मतदानाचा हक्क!!
भीमाशंकर कारखाना परिसरात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्यांमध्ये जाऊन तहसील कार्यालय आंबेगाव स्वीप पथकाच्यावतीने मतदार जनजागृती करण्यात आली अशी माहिती आंबेगाव मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके यांनी दिली.
१९६ आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतअधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक,नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ , स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके यांच्या मार्गदर्शनाखाली अगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील पारगाव तर्फे अवसरी गावात भिमाशंकर साखर कारखाना परिसरात विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची लगभग सुरू आहे त्यामुळे आंबेगाव विधानसभा स्वीप पथकाच्या वतीने तालुक्यातील कमी मतदान झालेल्या गावात जाऊन मतदान बंधू भगिनींना येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यावर्षी ऊसतोडणीसाठी महाराष्ट्रातील बीड, जालना, अहमदनगर, उस्मानाबादया जिल्ह्यातून महिला व पुरुष मतदार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात ऊसतोडणीसाठी कारखाना परिसरात दाखल झालेले आहेत. आंबेगाव तहसील कार्यालय स्वीप पथकाच्या वतीने ऊसतोडणी कामगारांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली . यावेळी उपस्थित ऊसतोड मजुरांनी आम्ही 20 नोव्हेंबर रोजी मतदानासाठी आपापल्या गावी जाऊन मतदानाचा अधिकार बजावू असा संकल्प यावेळी व्यक्त केला.
तसेच पारगाव तर्फे अवसरी गावात आठवडे बाजार,शासकीय कार्यालये,बँका, आदी भागात जनजागृती करण्यासाठी पोस्टर चिकटविण्यात आली.तसेच आठवडे बाजारात आलेल्या शिंगवे , पारगाव, निरगुडसर, जारकरवाडी, काठापूर,पोंदेवाडी, लाखणगाव इत्यादी गावातील लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले व मतदान संकल्प शपथ देऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी आंबेगाव विधानसभा स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके, तुषार शिंदे, सुरेश रोंगटे, अशोक लोखंडे, नारायण गोरे, राहुल रहाटाडे, विनायक राऊत उपस्थित होते.