आरोग्य व शिक्षणसामाजिक

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी !!

पंचनामा ठाणे प्रतिनिधी- दि. १४ (जिल्हा परिषद, ठाणे) – आज, दि. 14 मे, 2025 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ठाणे येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून करण्यात आली. यानंतर त्यांच्या अपरिमित शौर्य, निष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेला उजाळा देणारे विचार डॉ. परगे व डॉ. पाटील यांनी उपस्थितांपुढे मांडले. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.