आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूरच्या विद्यार्थ्यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च (२०२५)१००% निकालाची परंपरा कायम !!


पंचनामा शहापूर प्रतिनिधी – शहापूर मोहिली- अघई येथील विश्वात्मक जगंली महाराज आश्रम ट्रस्ट(कोकमठाण) संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात
आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल(सी.बी.एस.ई )केंद्रीय माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५
प्रथम क्रमांक सुजल ठाकरे ८४. ८०%गुण द्वितीय क्रमांक गौतम शिवांगी ८३. २०%गुण तृतीय क्रमांक ख़ुशी झा.७८.२०% गुण मिळून उत्तीर्ण झाले असून निकाल ९६. ५५ लागला.
आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यु. कॉलेज इयत्ता दहावी(एस. एस. सी)शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम क्रमांक दिवे भार्गवी विलास ८६.२०% गुण, गवळी दिशा सुरेश ८६. २०% गुण, द्वितीय क्रमांक कामडी सुमित सुदाम ८५. ४०% गुण, तृतीय क्रमांक अवतार मोनिका मनोहर ८३. २०%, चतुर्थ क्रमांक थोरात प्रियांका बंडू ८२. २०%, पाचवा क्रमांक वाघ भावना विठ्ठल ८१. ००% गुण, हडल राजश्री प्रदीप ८१. ००% गुण मिळून उत्तीर्ण झाले.
यात आत्मा मालिक ज्यु. कॉलेज(सायन्स)शालेय उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी २०२५ यात प्रथम क्रमांक जाधव चिराग किशोर,द्वितीय क्रमांक बोलडा नंदकुमार किशोर, गुहे अश्विनी मोहन,तृतीय क्रमांक थोरात रोहित मारुती असून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य व सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह, समस्त संत मांदियाळी, मुख्य शाखा विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट कोकमठाणचे सन्मा.अध्यक्ष, उपाध्यक्ष सरचिटणीस समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक शाखा मोहिली – अघईचे कार्याध्यक्ष व सर्व विश्वस्त वृंद यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
