समर्थ गुरुकुलच्या दहावीचा निकाल शंभर टक्के !!


पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले.समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सी.बी.एस.ई. मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
संस्कृती देशमाने ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.चैत्राली गुंजाळ ९१.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मुग्धा हाडवळे ९०.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
सार्थक आहेर ८९.८० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक,तनिष्का गडगे ८७.४० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक तर वैष्णवी माने ८० टक्के गुण मिळवून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
तसेच बारावी मध्ये तन्वी शिरोळे ७५.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक,प्रणव औटी ७४.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक,तर जय लामखडे ६९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
समर्थ गुरुकुल मध्ये फेब्रुवारी-मार्च प्रमाणपत्र परीक्षा २०२४-२५ साठी विशेष प्राविण्य श्रेणी मध्ये साई आग्रे-७९.८०%,साहिल भोसले-७६.८०%,आर्यन भांबेरे-७३.४०%,गौरव मटाले-७१.००% मिळवून हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याची माहिती पर्यवेक्षक सखाराम मातेले व क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे यांनी दिली.
या विद्यार्थ्यांना प्रा.शितल पाडेकर,प्रा.सुशील शेटे,प्रा.निशांत रोकडे,प्रा.सुकन्या हिंगे,प्रा.पूजा भुजबळ,प्रा.पल्लवी शिंदे,प्रा.रामचंद्र मते,प्रा.दिपाली नवले,प्रा.प्रतीक्षा पटाडे,प्रा.प्रिया कडूसकर,प्रा.विशाखा शिंदे,प्रा.कविता ठुबे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,सारिका ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





