नाते कलेचे त्या रक्ताशी – अष्टपैलू कलावंत, सौंदर्यतारका शांताबाई जाधव संक्रापुरकर
महाराष्ट्रातील जाणकार,सुज्ञ
कला प्रेमी रसिक जन हो….
नाते कलेचे त्या रक्ताशी या लेख मालेचे आजचे आकर्षण.
हिंदी, मराठी गाण्याची राणी ,लावणी डान्सर आवाजाची जादू असलेल्या गायिका वगनाटयातील अष्टपैलू कलावंत, सौंदर्यतारका शांताबाई जाधव संक्रापुरकर ता. अहमदनगर ह्या होय.त्यांच्या आईचे नाव कमलाबाई आहे.
वयाच्या नव्यावर्षापासून शांताबाईंच्या अंगी, नाचण्याची कला अवगत झाली होती.जनाजी मंतोडे हे शिपलापुरचे असून,ते व यादवराव जोर्वेकर या तमाशात फक्त एक महिना काम केले होते.
त्या नंतर लोकशाहीर साहेबराव नांदवळकर या तमाशा मंडळात काही दिवस काढून रसिकांमध्ये नाव मोठे केले.
नंतर मा.संभाजीराव जाधव संक्रापूरकर या तमाशात प्रवेश केला.तेथे शांताताई व संभाजीराव यांचेसोबत
वळण ता.राहुरी या ठिकाणी कलावंतांच्या समोर राहुटीत अक्षता टाकून लग्नच लावले.शांताताईनी कला अदाकारीने व आपल्या कला अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.त्या एक जबरदस्त स्त्री कलावंत आहेत.
कलेची झेप व ओढ ,आवड त्यांच्या कलाजीवनाचा मजबूत पाया आहे.
शांताबाईचा लावणीचा बाज म्हणजे नऊवारी साडी अंगभरून चोळी,केसाचा अंबाडा , नाकात नथ, कपाळी कुंकू, हातभर बांगड्या असा असून, रसिक टाळ्या व शिट्ट्याच्या गजरात त्यांचे स्वागत करतात.
शांताताईनी आजवर एड्स जनजागृती, ज्याला नाही अकलेचा पत्ता, त्याच्या हाती गावची सत्त्ता,
,पाप पुण्य ,सतिका ,सख्खे भाऊ पक्के वैरी, या वगनाटयात भूमिका करून, रसिकाच्या डोळ्याची पारणे फेडले आहे.
त्यांनी आपल्या कलाजीवनात कष्टाने कलागुणांचा तमाशा रसिकांच्या मनावर ठसा उमटविला आहे.
ताल, स्वर, लय या ज्ञानाने शांताताई अतिशय तयार आहे.
त्यांना वाशी महोत्सव मुंबई या ठिकाणी सन्मानचिंन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.
त्या सांगतात, की सध्या पूर्वीच्या तमाशाचा बाज म्हणजे गण गवळण, सवाल जबाब ,फारसा, शिलकार, पोवाडा, आणि वग नाट्य होत नसून, आज रसिक फक्त गाणी मागतात.
हीच मोठी आजच्या तमाशाची खंत वाटते.
खर तर, पारंपारिक तमाशाच फड मालकानी सादर केला पाहिजे. असे त्यांनी विचार मांडले.
जो पूर्वीचा तमाशा होता,तोच खरा तमाशा होता.
आता तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला अशा त्या म्हणाल्या.
शांताबाईचे वय ६६ वर्षाचे असून, रसिकांच ५६ वर्ष सेवा करीत आहेत.फडाचा खर्च भागत नाही, रसिकांचा त्रास या सर्व गोष्टींचा विचार केला तर ,फडमालकांना तमाशा परवडत नाही.असे शांताबाई म्हणाल्या.
कलेला रसिकांनी दाद दिली पाहिजे, तरच ही लोककला जिवंत राहील.शासनाने कलावंतांचा विचार करून, पुरस्कार द्यावा अशी शेवटी मागणी केली.
५६ वर्षाच्या कलायोगदानाने एक अष्टपैलू स्त्री तमाशा कलावंत म्हणून शांताबाईचे नाव कायम झळकत राहो, त्यांच्या कडून रसिकांची रंग देवतेची सेवा घडो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखक .
शाहीर खंदारे
ता. नेवासा
मो.8605558432